दिल्लीतील मुख्यमंत्र्यांना शासकीय निवासस्थान सोडायला लावलं, PWD चे अधिकारी म्हणाले…
दिल्लीतील आप सरकारच्या अडचणी वाढत आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आतिशी यांचं सामान त्यांच्या शासकीय निवासस्थानातून बाहेर काढण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने घर सील केलं आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या होत्या, परंतु अधिकृत पत्र नव्हतं. मुख्यमंत्री कार्यालयाने भाजपावर आरोप करत ही कारवाई अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे.