दिल्लीत लाडक्या बहिणीला निधी मिळणार की नाही? ‘महिला सन्मान योजना’ वादात!
दिल्लीच्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अतिशी आणि अरविंद केजरीवाल यांनी महिलांना दरमहा १००० रुपये देण्याची घोषणा केली, परंतु महिला व बालकल्याण विभागाने अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले. वित्त विभागानेही योजनेला विरोध केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी या पार्श्वभूमीवर टीका करणारी पोस्ट शेअर केली आहे.