“…तर मी देवेंद्र फडणवीस नाव सांगणार नाही”, मुख्यमंत्र्यांचा निर्धार; “आईशप्पथ सांगतो..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेचा इतिहास सांगितला आणि आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्याची विनंती केली. फडणवीसांनी उत्तर प्रदेश सरकारला मीना बझार येथील मुघल म्युझियम शिवाजी म्युझियममध्ये रुपांतरित करण्याची मागणी केली. त्यांनी आश्वासन दिलं की हे स्मारक ताज महालापेक्षा अधिक पर्यटकांना आकर्षित करेल.