पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
जागतिक स्तरावर अनेक आर्थिक संकटं आली आहेत, ज्यात अमेरिकेतली मंदी, दुष्काळी स्थितीमुळे अन्नधान्याचा तुटवडा आणि करोनामुळे निर्माण झालेलं संकट यांचा समावेश आहे. डॉमिनिका या कॅरेबियन देशानं मारिया चक्रीवादळामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी 'सिटीझनशिप-बाय-इन्व्हेस्टमेंट' योजना सुरू राबवली आहे. या योजनेतून श्रीमंतांना नागरिकत्व देऊन देशात गुंतवणूक करण्याची अट घातली आहे. या निधीचा वापर पायाभूत सुविधा, वैद्यकीय केंद्रे आणि घरांच्या उभारणीसाठी केला जाणार आहे.