ट्रम्प प्रशासनाचा हार्वर्ड विद्यापीठाला दणका, २.२ अब्ज डॉलर्सचा निधी रोखला; कारण काय?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने हार्वर्ड विद्यापीठाला दिलं जाणारं २.२ अब्ज डॉलर्सहून अधिक अनुदान गोठवलं आहे. विद्यापीठाने व्हाइट हाऊसच्या काही मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला होता. त्यामुळे विद्यापीठाचे प्रमुख अॅलन गार्बर यांनी शैक्षणिक स्वायत्ततेवर संघराज्याचं अतिक्रमण नाकारलं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या मागण्या अतिरेकी व अस्वीकार्य असल्याचं गार्बर यांनी नमूद केलं आहे.