युक्रेन रशिया युद्ध थांबणार? डोनाल्ड ट्रम्प यांची पुतिन यांच्याशी फोनवरुन काय चर्चा ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. पुतिन यांनी युद्ध कैद्यांची सुटका आणि युक्रेनशी युद्ध थांबवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. ट्रम्प लवकरच पुतिन यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणात बदल करत, ट्रम्प यांनी युक्रेनच्या नाटो सदस्यत्वाला पाठिंबा दिला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्युनिक संमेलनात सहभागी होणार आहेत.