डोनाल्ड ट्रम्प यांचं मित्राला ‘स्पेशल गिफ्ट’, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं ‘हे’ पुस्तक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी मोदींना 'अवर जर्नी टुगेदर' हे फोटोबुक भेट दिलं, ज्यात त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घटनांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी पुस्तकात मोदींचं कौतुक करत "मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट" असा संदेश लिहिला.