अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे. अमेरिकन संसदेत हा शपथविधी सोहळा पार पडला. मेलेनिया ट्रम्प यांनी खास ड्रेस परिधान केला होता. शपथविधीपूर्वी ट्रम्प यांनी अनेक आदेशांवर सह्या करण्याचे जाहीर केलं होतं. फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, अॅमेझॉनचे जेफ बेजॉस आणि एलॉन मस्क उपस्थित होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी अमेरिकेत सुवर्णयुग सुरु झाल्याचे म्हटलं आहे.