“माझे भारताशी खूप चांगले संबंध, फक्त एक समस्या आहे”, डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान; भारतावर..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांवर जगभर चर्चा होत आहे. विशेषतः बेकायदा स्थलांतरीतांची घरवापसी आणि इतर देशांवर टेरिफ लागू करण्याच्या भूमिकेमुळे भारताशी संबंध अडचणीत आले आहेत. ट्रम्प यांनी भारताच्या टेरिफ दरांवर टीका केली आणि २ एप्रिलपासून अमेरिकेनेही तितकेच दर आकारण्याची घोषणा केली. आयएमईसीबद्दल त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली, परंतु अमेरिकेचे हितसंबंध न जपणाऱ्यांविषयी कठोर भूमिका घेतली.