ट्रम्प यांच्या अधिकाऱ्याची करामत; अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे चॅट झाले लीक; गोपनीय माहिती…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका अधिकाऱ्याने येमेनमधील हवाई हल्ल्यांबाबतच्या गोपनीय चॅट ग्रुपमध्ये चुकून 'दी अटलांटिक'चे मुख्य संपादक जेफरी गोल्डबर्ग यांना अॅड केले. त्यामुळे संवेदनशील माहिती लीक झाली. व्हाईट हाऊसने ही चूक मान्य केली असली तरी ट्रम्प यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शवली. या घटनेवर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे.