Video: मनमोहन सिंग यांचा अमेरिकन संसदेत प्रवेश आणि तीन मिनिटं टाळ्यांचा कडकडाट!
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक मितभाषी सौजन्य हरपले आहे. त्यांच्या प्रगाढ ज्ञानाला अमेरिकन संसदेत मिळालेल्या ३ मिनिटांच्या स्टँडिंग ओवेशनने मान्यता मिळाली होती. २००५ साली अमेरिकेसोबत अणुकरार करताना त्यांनी जगाचे लक्ष वेधले. त्यांच्या भाषणादरम्यान अमेरिकन संसद सदस्यांनी ३२ वेळा उभं राहून टाळ्यांच्या गजरात अभिवादन केले.