दुबईचे क्राऊन प्रिन्स चौथ्यांदा बनले वडील, कन्यारत्नाचं नाव ठेवलं हिंद!
दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम चौथ्यांदा वडील बनले आहेत. त्यांच्या पत्नी शेखा शेख यांनी गोंडस मुलीला जन्म दिला असून तिचं नाव हिंद ठेवलं आहे. हे नाव शेख हमदानच्या आईच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं आहे. शेख हमदान यांनी इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली आणि मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मागितले. त्यांच्या या पोस्टवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.