ईदच्या दिवशी नमाज अदा करण्यापासून रोखल्याचा पोलिसांवर आरोप, घोषणाबाजीचा व्हिडीओ व्हायरल
रमजान ईदच्या निमित्ताने मुरादाबादमध्ये नमाज अदा करण्यासाठी जमलेल्या मुस्लिम बांधवांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाला. पोलिसांनी गर्दीमुळे काही लोकांना ईदगाहमध्ये जाण्यापासून रोखल्याने हा वाद निर्माण झाला. नंतर इमामांनी सर्वांना बोलावून पुन्हा नमाज पठण केले. मुरादाबादचे पोलीस अधीक्षक सतपाल अंतिल यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशातील इतर भागांमध्ये ईद शांततेत आणि उत्साहात साजरी झाली.