‘आंतरराष्ट्रीय मदतीवर पोसलेला देश’, यूएनमध्ये पुन्हा एकदा भारताकडून पाकिस्तानची धुलाई
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५८ व्या सत्रात भारताने पाकिस्तानवर कडाडून टीका केली. भारतीय प्रतिनिधी क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानला अपयशी राष्ट्र म्हणत, आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असल्याचे सांगितले. त्यांनी पाकिस्तानच्या लष्कर आणि दहशतवादी संघटनांच्या युतीवरही प्रकाश टाकला. जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.