UPI पेमेंट करताय? मग ‘हा’ बदल तुमच्यासाठी महत्त्वाचा; Chargeback मुळे प्रतिक्षेतून सुटका!
बहुतांश मोबाईलधारक यूपीआय पेमेंटचा वापर करतात, ज्यात पेटीएम, फोन पे, जीपे, अॅमेझॉन पे यांसारखे पर्याय आहेत. यूपीआय व्यवस्थेत १५ फेब्रुवारीपासून NPCI ने तांत्रिक बदल केला आहे, ज्यामुळे चार्जबॅक प्रक्रियेत सुधारणा झाली आहे. नव्या TCC प्रणालीमुळे तांत्रिक बिघाड झाल्यास पैसे लवकर परत मिळतील, परिणामी ग्राहकांना त्यांच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.