Good news: गृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होणार; ५ वर्षांनी आरबीआयची व्याजदर कपात
गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) रेपो रेटमध्ये कपात केली आहे. याआधी मे २०२०मध्ये व्याजदर कपात झाली होती. आता आरबीआयनं २५ बेसिस पॉइंटने व्याजदर कमी करून ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणला आहे. या निर्णयामुळे शेअर बाजार आणि भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होतो, यावर अर्थतज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.