बाजारपेठेत कोलाहल! Sensex च्या गटांगळ्या, १२०० अंकांनी घसरला; नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात सततची पडझड गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. गुरुवारी Sensex १२०० अंकांनी कोसळला, तर Nifty50 नेही घसरण कायम ठेवली. शेअर बाजारातील या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी पाण्यात गेले आहेत. अमेरिकेतील व्याजदर कपात, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि रुपयाचे अवमूल्यन ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.