अमेरिका-चीन टॅरिफ वॉर, पण भुर्दंड भारताला? केंद्रीय सचिवांनी व्यक्त केली ‘ही’ भीती!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या Reciprocal Tariffs मुळे जागतिक व्यापारात खळबळ उडाली आहे. चीनने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर अतिरिक्त कर लादण्याची धमकी दिली, ज्यामुळे अमेरिकेने चीनवर १०४ टक्के कर लागू केला. या 'टॅरिफ वॉर'चा भारतावर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता केंद्रीय सचिव एस. कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. चीनचा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी किमतीत येऊ शकतो, ज्यामुळे भारतीय उत्पादकांना फटका बसू शकतो.