राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि संघाने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या विधानामुळे गुवाहाटी येथील पान बाजार पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि १९७(१)d अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने गांधींच्या वक्तव्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा आरोप केला आहे.