पाकिस्तानची पुन्हा आगळीक, LOC वर सीमेपलीकडून गोळीबार; भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात वातावरण तापले आहे. अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. भारताने सीमाबंदीचे पाऊल उचलले असताना, पाकिस्तानने वारंवार चुकांवर चुका केल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर २४ तासांत बांदीपोरा भागात घुसखोरी झाली. गुरुवारी पाकिस्तानने पुन्हा सीमेपलीकडून गोळीबार केला, ज्याला भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.