“आम्हाला अमेरिकेची चिंता नाही”, एस. जयशंकर म्हणाले, “ट्रम्प यांनी पहिल्या तीन कॉलमध्ये…”!
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विराजमान होणार आहेत. या सत्तांतरामुळे जागतिक धोरणांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु, भारताला याची चिंता नसल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यांनी भारत-अमेरिका संबंधांवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच, भारताच्या आर्थिक धोरणांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे जागतिक स्तरावर भारताचं कौतुक होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.