मनमोहन सिंग म्हणाले होते, “…तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ”!
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९९१ साली अर्थमंत्री म्हणून त्यांनी आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवून भारताला जागतिक बाजारपेठेत प्रबळ दावेदार बनवले. पंजाब विद्यापीठ आणि अमृतसरच्या हिंदू कॉलेजमधील काळ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ होता. चंदीगडवर त्यांचे विशेष प्रेम होते आणि त्यांनी पंजाब विद्यापीठाला ३५०० पुस्तकं भेट दिली होती.