Dr. Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते आणि २००४ ते २०१४ या काळात पंतप्रधान होते. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे.