गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचं जामिनानंतर जंगी स्वागत; हारतुऱ्यांनी केला सत्कार!
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी, परशुराम वाघमोरे आणि मनोहर यदावे, यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर त्यांचं बंगळुरूमध्ये हारतुऱ्यांनी स्वागत करण्यात आलं. २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात त्यांनी परखड भूमिका घेतली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणातील आरोपींवर खटला वेगाने चालवण्यासाठी विशेष कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली होती.