“भारतात गप्प, तर विदेशात…”; गांधींची मोदींवर बोचरी टीका!
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न विचारण्यात आला. मोदींनी उत्तर दिले की, दोन देशांचे नेते वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत. यावर राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना म्हटले की, देशात प्रश्न विचारला तर गप्प राहतात आणि विदेशात प्रश्न विचारला तर खासगी मुद्दा असल्याचं म्हणतात.