गोव्यातील पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने ‘या’ उपक्रमावर आणली स्थगिती!
महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मृत्यू झाल्यानंतर गोवा सरकारने राज्यभरातील पॅराग्लायडिंग उपक्रम तात्काळ स्थगित केले आहेत. पर्यटन संचालक केदार ए नाईक यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व ऑपरेटरने आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांना ५० हजार रुपये दंड होईल. शिवानी डबळे आणि पायलट सुमन नेपाळी यांच्या मृत्यूनंतर हा निर्णय घेण्यात आला.