पाकिस्तानला सापडलं ८० हजार कोटींचं सोन्याचं घबाड, सिंधू नदीच्या पोटात दडली होती खाण!
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानची आर्थिक स्थिती खालावली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक मदत दिली असून, अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत, सिंधू नदीत ८० हजार कोटींचं सोनं सापडल्याने पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. अटक परिसरात सापडलेल्या या सोन्याचा शोध सरकारी संस्थांनी लावला आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, हे सोनं हिमालयातील साठ्यातून वाहून आलेलं आहे.