Hamas Leader Yahya Sinwar Killed in Marathi
1 / 30

Video: रक्ताळलेला हात घेऊन धुळीत बसलेला याह्या सिनवर! हमासच्या म्होरक्याचा ‘असा’ झाला अंत!

गेल्या वर्षभरात इस्रायल-हमास संघर्ष चर्चेत होता. गुरुवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ठार झाला. यामुळे हमासला मोठा धक्का बसला आहे. इस्रायलच्या लष्कराने शेअर केलेल्या व्हिडीओत सिनवार गंभीर जखमी अवस्थेत दिसतो. १९८८ ते २०११ तुरुंगात असलेला सिनवार २०१७ मध्ये हमासचा प्रमुख बनला. त्याच्या क्रूरतेमुळे त्याला 'कसाई' म्हटलं जातं.

Swipe up for next shorts
Rinku rajguru childhood photo with father
2 / 30

फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? जगभरात ११० कोटी रुपये कमावणाऱ्या सिनेमात केलंय काम

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त बालपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोत रिंकू लहान असताना तिचे वडील तिला कडेवर घेऊन उभे आहेत. तिने 'बेस्ट बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा' असे लिहिले आहे. रिंकूने 'सैराट' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तिचे वडील महादेव राजगुरू शिक्षक आहेत. 'सैराट' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०४ कोटी रुपये कमावले होते.

Swipe up for next shorts
Aishwarya Rai Bachchan Bodyguard Salary
3 / 30

ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचा पगार किती? जाणून घ्या

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमी चर्चेत असते. तिच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड शिवराज असतो, जो अनेक वर्षांपासून बच्चन कुटुंबासाठी काम करतो. शिवराजला ऐश्वर्या राय वार्षिक एक कोटींहून अधिक पगार देते. सेलिब्रिटींच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. अनुष्का शर्मा व विराट कोहली यांचाही बॉडीगार्ड सोनूला १.२ कोटी रुपये वार्षिक पगार दिला जातो.

Swipe up for next shorts
How to Prepare Sugandhi Utane at Home in Marathi
4 / 30
marathi actress pranit hatte reaction on bigg boss marathi season 5 fame ghanshyam darode viral video
5 / 30

“बिग बॉस मराठीला तू कलंक होतास”, छोट्या पुढारीचा ‘त्या’ व्हिडीओवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचे फोटो, व्हिडीओ हे सतत व्हायरल होताना दिसत आहेत. सहाव्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर झालेला छोटा पुढारी म्हणजे घनःश्याम दरवडेचा ( Ghanshyam Darode ) एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. “मी कधी बिग बॉसच्या घरात राजकारण केलं नाही”, असं वक्तव्य व्हायरल व्हिडीओमध्ये घनःश्याम करताना दिसत आहे. याच व्हिडीओवर मराठी अभिनेत्री प्रतिक्रिया दिली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

Suraj Chavan Gautami Patil Video
6 / 30

‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहिलात का?

सूरज चव्हाण, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता, सध्या चर्चेत आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या सूरजने संघर्ष करून यश मिळवले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याचा सत्कार केला होता. डान्सर गौतमी पाटीलनेही सूरजची भेट घेतली आणि त्यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सूरजच्या साधेपणाचे कौतुक होत आहे.

Salman Khan was pulled over by a traffic cop who didn't recognise him.
7 / 30

“मी सलमान खान आहे” म्हणत दबंग खानने चालवली होती फूटपाथवर गाडी, पोलिसांनी थांबवल्यावर…;

२००२ साली हिट अॅन्ड रन प्रकरणात सापडलेला सलमान खान पूर्वीपासूनच साहसी होता, असं त्याचा मित्र आसिफ शेखने सांगितलं. १९९८ च्या बंधन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने फूटपाथवर गाडी चालवली होती. एकदा ट्रॅफिक पोलिसाने त्याला पकडलं, पण ओळखलं नाही. तसेच, हैदराबादमध्ये सलमानने मित्राची कार बेदरकारपणे चालवून त्याला घाबरवलं होतं, पण नंतर हसला.

nikki tamboli on suraj chavan won bigg boss sympathy card
8 / 30

सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला? निक्की तांबोळी म्हणाली…

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला, तर उपविजेता अभिजीत सावंत होता. निक्की तांबोळी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. निक्कीने सूरजच्या विजयाबद्दल मतं मांडली, "माझ्या नशिबात ट्रॉफी नव्हती, पण चाहत्यांनी सूरजला जिंकवलं." तिने शोमध्ये उद्धटपणे बोलल्याची खंत व्यक्त केली. सूरज विजेता होण्यासाठी पात्र होता, असंही निक्कीने नमूद केलं.

Bikaji foods owner Shivratan Agarwal success story he left family business haldiram and started shivdeep food products
9 / 30

फक्त ८ वी शिकून झाले कोटींचे मालक, वाचा शिवरतन अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

कष्ट, अखंड मेहनत व सातत्याने शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो, असं म्हणतात. एका लहानशा गोष्टीपासून मोठा व्यवसाय उभारण्यासाठी परिश्रम, जिद्द आणि कुटुंबाची साथ असावी लागते. आज आपण अशाच एका हरहुन्नरी व्यक्तीच्या यशाची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्याने आजोबांच्या एका छोट्याशा दुकानाचं एका मोठ्या ब्रॅंडमध्ये रुपांतर केलं.

indian economy world bank
10 / 30

जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं…”

विरोधक केंद्र सरकारवर बेरोजगारी, महागाई, गरिबी आणि मध्यमवर्गाच्या आर्थिक अडचणींवर टीका करत आहेत. मात्र, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक केलं आहे. त्यांनी भारताचा विकासदर जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वात उज्ज्वल बाब असल्याचं म्हटलं आहे. यात भारताच्या अंतर्गत बाजारपेठेतील उत्पन्नाचा मोठा वाटा असल्याचंही जागतिक बँकेनं नमूद केलं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी काही आव्हानांचाही उल्लेख केला आहे.

Radhika Merchant offers birthday cake to brother-in-law Akash Ambani but he is refused video viral
11 / 30

Video: राधिका मर्चंटकडून आकाश अंबानीने केक खाण्यास नकार का दिला? जाणून घ्या…

गुरुवारी ( १७ ऑक्टोबरला ) अनंत अंबानीची पत्नी राधिका मर्चंट हिचा ३०वा वाढदिवस होता. लग्नानंतरचा राधिकाचा पहिला वाढदिवस अँटिलियामध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या पार्टीत बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Kamala Harris US Election 2024
12 / 30

“तुम्ही कमला हॅरिस यांना मतदान करणार ना?” अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय एकवटले

अमेरिकन डेमोक्रेटिक फंडरेझने कमला हॅरिस यांच्यासाठी दक्षिण आशियाई मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये विविध दक्षिण आशियाई भाषांचा वापर केला आहे आणि बॉलिवूड प्रेरित गाण्यांचा समावेश आहे. अजय भुटोरिया यांनी सांगितले की, हजारो स्वयंसेवक कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ कार्यरत आहेत. ५० लाखांहून अधिक भारतीय अमेरिकन मतदारांसाठी हॅरिस आशेचा किरण आहेत. यासाठी त्यांनी मराठी भाषेतूनही आवाहन केलं आहे.

salman khan life threat lawrence bishnoi gang
13 / 30

“जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी; केली ‘ही’ मागणी!

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव घेतलं असून ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा उल्लेख करत, सलमानची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट होईल, असं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Who was Yahya Sinwar?
14 / 30

Yahya Sinwar : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार कोण होता? त्याला ‘कसाई’ का म्हटलं जायचं?

इस्रायलच्या लष्कराने हमासचा म्होरक्या याह्या सिनवारला ठार केलं आहे. गाझा पट्टीतील एअर स्ट्राईकमध्ये तीन दहशतवाद्यांना मारण्यात आलं, त्यात सिनवार होता. ७ ऑक्टोबरच्या नरसंहारासाठी तो जबाबदार होता. सिनवारने २२ वर्षे तुरुंगात घालवली आणि २०१७ पासून हमासचा म्होरक्या म्हणून काम केलं. त्याच्या क्रौर्यामुळे त्याला 'कसाई' म्हटलं जातं होतं. २०१५ मध्ये त्याचं नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आलं.

Maharahtra Congress
15 / 30

वांद्र्यातून असिफ झकारिया तर, मालाडमधून अस्लम शेख; काँग्रेसची पहिली यादी जाहीर?

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या असून महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. काँग्रेसची पहिली उमेदवार यादी व्हायरल होत आहे, परंतु काँग्रेसने स्पष्ट केले आहे की त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले असून लवकरच योग्य माध्यमांद्वारे यादी जाहीर केली जाईल, असे महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

hansika motwani new home gruh pravesh
16 / 30

प्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराचे खास Photos

लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने पती सोहेल खातुरियाबरोबर नवीन घर घेतलं आहे. तिने गृहप्रवेशाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हंसिका हिरव्या साडीत आणि सोहेल कुर्त्यात दिसत आहेत. दोघांनी एकत्र पूजा करून नवीन घरात प्रवेश केला. सोहेल व हंसिकाने नोव्हेंबर २०२२ मध्ये लग्न केलं होतं.

jitendra awhad allegation maharashtra government
17 / 30

शिंदे सरकारने किक्रेटपटूंना जाहीर केलेली बक्षीस अद्यापही दिलं नाही – जितेंद्र आव्हाड

जून महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार केला होता. तसेच त्यांना ११ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केलं होतं. त्यावेळी सरकारच्या या निर्णयाची बरीच चर्चाही झाली होती. मात्र, आता भारतीय संघातील खेळाडूंना बक्षिसांची ही रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावरून राज्य सरकारवर टीकाही केली आहे.

Nawaz Sharif on Pm Narendra Modi
18 / 30

“मोदी पाकिस्तानात आले असते तर…”, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे मोठे विधान

पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्लामाबादला भेट दिली. या दौऱ्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा केली. शरीफ यांनी नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले असते तर अधिक आनंद झाला असता असेही म्हटले.

up firing news, marathi news, bahraich violence
19 / 30

बहराइच हिंसाचार : गोपाल मिश्रा हत्याप्रकरणातील आरोपींवर पोलिसांचा गोळीबार

रविवारी उत्तर प्रदेशाच्या बहराइचमध्ये दुर्गादेवीच्या विसर्जनादरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचारात २२ वर्षीय राम गोपाल मिश्रा या तरुणाचा मृत्यू झाला होता, तर इतर सात जण जखमी झाले होते. दरम्यान, आता गोपाल मिश्रा हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांबरोबर चकमक झाल्याची माहिती पुढे आली आहे. या चकमकीत दोन आरोपी जखमी झाले आहेत.

surya nakshatra gochar 2024
20 / 30

धनत्रयोदशीपूर्वीच फळफळणार ‘या’ राशींचे नशीब! सूर्याच्या नक्षत्र होणार प्रचंड श्रीमंत

ग्रहांचा राजा सूर्यदेव एका ठराविक काळानंतर राशिस्थान बदलतो. हा बदल सूर्य दर महिन्याला करीत असतो. या घटनेचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडतो. यावेळी सूर्य चित्रा नक्षत्रात स्थित आहे; पण धनत्रयोदशीपूर्वी म्हणजेच २४ ऑक्टोबरला तो चित्रा नक्षत्रातून स्वाती नक्षत्रात प्रवेश करील. राहूच्या नक्षत्रात सूर्याने प्रवेश केल्यामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकते; तर काही राशींच्या लोकांना काळजी घेण्याची गरज भासू शकते.

Jahnavi Killekar took so many clothes in the house of Bigg Boss Marathi Season 5
21 / 30

‘बिग बॉस मराठी’च्या घरात जान्हवी किल्लेकर घेऊन गेली होती ‘इतके’ कपडे, म्हणाली…

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून १० दिवस उलटले आहेत. पण, तरीही चर्चा कायम आहे. यंदाच्या पर्वातील टॉप-६ स्पर्धेक सध्या प्रसिद्धी झोतात आले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच एका मुलाखतीतून जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात किती कपडे घेऊन गेली होती? याचा खुलासा केला आहे.

ghaziabad maid mixes urine in food
22 / 30

“..म्हणून जेवणात लघवी मिसळली”, किळसवाण्या प्रकारानंतर मोलकरणीनं सांगितली धक्कादायक माहिती

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बांधकाम व्यावसायिकाच्या घरात काम करणारी मोलकरीण रिना ही चपात्याच्या पिठात लघवी मिसळत होती. यामुळे कुटुंबातील सदस्य यकृताच्या आजाराने त्रस्त होते. संशय आल्याने घरमालकांनी स्वयंपाक घरात कॅमेरा लावला आणि हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी रिनाला अटक केली असून तिने सूडबुद्धीने हे कृत्य केल्याचे मान्य केले आहे.

punjab congress amrinder singh raja warring on lawrence bishnoi
23 / 30

“लॉरेन्स बिश्नोई व केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी शिजतंय”, काँग्रेसचा आरोप!

गेल्या काही वर्षांत लॉरेन्स बिश्नोई हे नाव आंतरराष्ट्रीय चर्चेत आलं आहे. सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणांमध्ये त्याचं नाव आलं आहे. कॅनडाने हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणात भारत सरकारवर आरोप केले आहेत, ज्यात बिश्नोई गँगचा उल्लेख आहे. काँग्रेसने यावरून सरकारवर टीका केली आहे. अमरिंदर सिंग यांनी बिश्नोईच्या तुरुंगातील हालचालींवर शंका उपस्थित केली आहे.

Bihar hooch Tragedy
24 / 30

दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूंचं तांडव, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकांनी दृष्टी गमावली आहे. या प्रकरणी १२ लोकांना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी हा हत्येचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. खेरवा परिसरातील मुसहरी टोला गावात प्रत्येक घरात शोककळा पसरली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सत्ताधारी नेते, पोलीस आणि माफियांच्या संगनमताने दारूबंदी फक्त कागदावर असल्याचा आरोप केला आहे.

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana Diwali Bonus
25 / 30

लाडक्या बहिणींना खरंच अडीच हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार? नेमका शासन निर्णय काय?

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ज्यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. मात्र, दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या अफवा खोट्या आहेत, असे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. योजनेच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

baba siddique murder case (1)
26 / 30

Baba Siddique Killing: “व्हीआयपी आमचं ऐकतच नाहीत”, सुरक्षा अधिकाऱ्यांची तक्रार!

मुंबई October 17, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत वांद्रे भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसरा फरार आहे. सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा असूनही हल्ला कसा झाला, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्हीआयपी व्यक्तींच्या असहकाराची तक्रार केली आहे. सुरक्षा बैठकीत या तक्रारींवर चर्चा झाली असून, सुरक्षा अधिकाऱ्यांना सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Baba Siddique accused
27 / 30

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी फरार आरोपी कुठे? मुंबई पोलिसांकडून अखेर लुक आऊट नोटीस जारी!

मुंबई October 17, 2024

बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी शुभम लोणकर अद्याप फरार आहे. त्याचा भाऊ प्रवीण लोणकर अटक झाला असून, शुभमसह शिवा गौतम आणि मोहम्मद झिशान अख्तर यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी १५ पथके तैनात केली आहेत. शुभमसाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. शुभम अकोट येथील असून, पोलिसांनी त्याच्या पुण्यातील घरी छापा टाकला. प्रवीणला अटक झाली, पण शुभम फरार आहे.

Marathi Actress khushboo tawde Share first post after becoming a mother for the second time
28 / 30

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर खुशबू तावडेने चिमुकल्या लेकीसह शेअर केले फोटो, नाव केलं जाहीर

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री खुशबू तावडे काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई झाली. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी खुशबूची मैत्रीण अभिनेत्री वैशाली भोसलेने सोशल मीडियाद्वारे जाहीर केली होती. खुशबूबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं होतं, “मुलगी झाली…अभिनंदन.” त्यानंतर नुकतीच खुशबू तावडेने स्वतः पोस्ट करत लेकीचं नाव जाहीर केलं आहे.

Baba Siddique Shot Dead at Bandra Mumbai Breaking News Updates in Marathi
29 / 30

बाबा सिद्दीकी यांना मारण्याकरता हल्लेखोरांकडून ‘या’ देशातील शस्त्रांचाही वापर!

मुंबई October 17, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी निर्मल नगर येथे गोळीबार करून हत्या करण्यात आली. बिश्नोई गँगने हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, काही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन पिस्तुल जप्त केल्या आहेत. हल्लेखोरांनी दुचाकी न वापरण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

justin trudeau on hardeep singh nijjar murder case (1)
30 / 30

जस्टिन ट्रुडो म्हणतात, “भारतानं एक भयंकर चूक केली”, हरदीप सिंग निज्जर…

खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्या प्रकरणामुळे भारत-कॅनडा संबंध ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताचा सहभाग असल्याचा पुनरुच्चार केला आहे. ट्रुडो यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे आरोप केले होते, असे स्पष्ट केले. भारताने यावर परखड प्रत्युत्तर दिले आहे. जी-२० परिषदेतही ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदींना या प्रकरणाबाबत सांगितले होते. द्वीपक्षीय संबंध चिघळण्याची शक्यता आहे.