“कुस्तीपटूंच्या आंदोलनामागे…”, विनेश फोगाट काँग्रेसमध्ये जाताच बृजभूषण सिंहांची आगपाखड
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विनेशला विधानसभा निवडणुकीचं तिकिट मिळालं असून बजरंगलाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसवर षडयंत्राचा आरोप केला आहे. भाजपाने आदेश दिल्यास ते हरियाणात विनेश-बजरंगविरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.