चीनकडून ऑर्डर मिळाली आणि गोदामातून रुपये एक कोटींचे केस गेले चोरीला; कुठे घडली चोरी
बंगळुरूच्या लक्ष्मीपूर येथील गोदामातून ९० लाख ते १ कोटी रुपयांचे केस चोरीला गेले आहेत. हे केस चीन, बर्मा आणि हाँगकाँगला निर्यात होणार होते. २८ फेब्रुवारी रोजी सहा जणांच्या टोळक्याने ही चोरी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चोरांना गोदामातील साठ्याची माहिती आधीपासूनच होती, असा संशय आहे.