…तर भारत ठरेल जगातील चौथा देश, भारताच्या SpaDex मिशनकडे जगाचं लक्ष!
इस्रोच्या SpaDeX डॉकिंग मिशन अंतर्गत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक २०३५ पर्यंत असण्याचं उद्दीष्ट्य आहे. यासाठी डॉकिंग क्षमता महत्त्वाची आहे. आज चेजर आणि टार्गेट या दोन स्पडेक्स सॅटेलाईट्सचं डॉकिंग प्रयोग होणार आहे. यामुळे भारत स्पेस डॉकिंग करणारा चौथा देश ठरेल. यशस्वी डॉकिंगमुळे भविष्यातील चंद्र मोहिमा आणि अंतराळ स्थानक उभारणीसाठी महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवता येईल.