भारतानं फटकारल्यानंतर पाकिस्तानला आली जाग, पहलगाम हल्ल्याबाबत उच्चस्तरीय बैठका!
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. सिंधु जल करार रद्द करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी आणि भारतीयांनी पाकिस्तान सोडणे यासारख्या निर्णयांचा समावेश आहे. पाकिस्तानने या निर्णयांचा निषेध केला असून, उच्चस्तरीय बैठका आयोजित केल्या आहेत. पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत भारताच्या निर्णयांना उत्तर देण्याची तयारी केली जात आहे.