भारतीय वंशाचे प्रदीप पटेल आणि त्यांच्या मुलीची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या
अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये २० मार्चला एका स्टोअरमध्ये गोळीबारात ५६ वर्षीय प्रदीप कुमार पटेल आणि त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली. आरोपी जॉर्ज फ्राझियरला अटक करण्यात आली आहे. गोळीबारात एक महिला जखमी झाली आहे. प्रदीप कुमार मूळचे मेहसाणचे होते. त्यांच्या मृत्यूने पटेल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुजराती समाजाने शोक व्यक्त केला आहे.