कॅनडात भारतीय विद्यार्थीनीचा गोळीबारात मृत्यू; बस स्टॉपवर उभी असताना अचानक लागली गोळी
कॅनडातील हॅमिल्टन येथे बस स्टॉपवर उभ्या असलेल्या २१ वर्षीय हरसिमरत रंधावा या भारतीय विद्यार्थीनीचा गोळी लागून मृत्यू झाला. दोन वाहनांमधील गोळीबारात निष्पाप हरसिमरत नाहक बळी गेला. ती मोहॉक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मागील चार महिन्यांत कॅनडात चार भारतीय विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत.