“भारतीय वाईट असतात, तुम्हाला…”; नर्सला जबर मारहाण करत हाडं तोडली
फ्लोरिडा येथील पाम्स वेस्ट रुग्णालयात ६७ वर्षीय भारतीय वंशाच्या नर्स लीला लाल यांना मानसिक रुग्ण स्टिफन स्कँटलबरीने जबरदस्त मारहाण केली. या हल्ल्यात लीला यांच्या चेहऱ्याची सगळी हाडं मोडली असून त्यांना अंधत्व येण्याची शक्यता आहे. स्टिफनने वर्णभेदी टिपण्णी करत हल्ला केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.