झारखंडमधील आंतरधर्मीय जोडप्याला केरळ उच्च न्यायालयाचं संरक्षण; जीविताला धोक्यामुळे…
झारखंडमधून लव्ह जिहादच्या आरोपानंतर पळून आलेल्या जोडप्याला केरळ उच्च न्यायालयाने आश्रय आणि संरक्षण दिले आहे. ३० वर्षीय मुस्लीम तरुणाने २६ वर्षीय हिंदू तरुणीशी विवाह केल्यानंतर त्यांना जीविताला धोका निर्माण झाला. त्यांनी केरळमध्ये दोन्ही पद्धतींनी विवाह केला. तरुणीने स्वखुशीने केरळला आल्याचा दावा केला. न्यायालयाने केरळ पोलिसांना जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.