Video: पुणे-मुंबईतून आकाशात दिसलं दुर्मिळ दृश्य; कोणत्याही दुर्बिणीशिवाय पाहायला मिळालं ISS
रविवारी संध्याकाळी पुणे-मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (ISS) नुसत्या डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळाली. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्यासह इतर अंतराळवीर सध्या या स्थानकात आहेत. हे स्थानक पृथ्वीपासून ४०० किमी अंतरावर असून, ७ किमी/सेकंद वेगाने पृथ्वीभोवती ९०-१०० मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतं. प्रसाद दीक्षित यांनी या घटनेचा व्हिडीओ 'लोकसत्ता'ला शेअर केला.