“मी २१ वर्षांचा होतो, खूप घाबरलो होतो…”,रघू रामने सांगितला व्हर्जनिटी गमावल्यानंतरचा अनुभव
व्हर्जिनिटी म्हणजे कौमार्य गमावणे हे बऱ्याचदा अनेकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जाते, पण त्यामुळे लोकांना नेहमीच आनंद किंवा मुक्तता मिळत नाही. कधीकधी, त्यामुळे अपराधीपणा, पश्चात्ताप किंवा दुःख यासारख्या अनपेक्षित भावना येऊ शकतात." अभिनेता रघु रामने २१ व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावल्यानंतर खूप अस्वस्थ झाल्याचा धक्कादायक अनुभव शेअर केला. त्याने कबूल केले की, त्याला अपराधीपणाची भावना जाणवत होती, जणू काही त्याने त्याचे आणि त्याच्या जोडीदाराचे आयुष्य 'उध्वस्त' केले आहे.