गाझात इस्रायलचा बॉम्बवर्षाव चालूच, UN ची इमारत लक्ष्य; संयुक्त राष्ट्राचा कर्मचारी ठार!
इस्रायलकडून गाझा पट्टीत सुरू करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर इस्रायल व हमास यांच्यातील युद्धबंदी यशस्वी झाली होती, परंतु आता इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टी अशांत झाली आहे. या हल्ल्यांमध्ये संयुक्त राष्ट्राच्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असून, इस्रायलने हल्ल्याचा आरोप फेटाळला आहे. गाझा प्रशासनानुसार, हल्ल्यांमध्ये ४०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.