हम्पीमध्ये इस्रायलच्या महिलेवर बलात्कार, परदेशी पर्यटकांना मारहाण; एकाचा मृत्यू
कर्नाटकातील हम्पी येथे इस्रायलच्या २७ वर्षीय महिला पर्यटक आणि २९ वर्षीय होम स्टे मालक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री सानापूर तलावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी पाच पर्यटकांवर हल्ला केला. एका पुरूष पर्यटकाचा मृतदेह तलावात आढळला. पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनास्थळी दुचाकी, कॅमेऱ्याची बॅग, आणि रक्ताने माखलेले कपडे सापडले.