नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये शुक्रवारी रात्री महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षदर्शी भगवान दास यांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.