देशात पहिल्यांदाच बेकायदा पिस्तुल परवानाप्रकरणी IAS अधिकाऱ्याविरोधात कारवाई होणार!
जम्मू-काश्मीरमध्ये अवैध पिस्तुल परवाने वाटप प्रकरणात महसूल सचिव कुमार राजीव रंजन यांच्यावर सीबीआय कारवाई करणार आहे. २०१२-२०१६ दरम्यान २.७४ लाखांहून अधिक परवाने आर्थिक फायद्यासाठी दिल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्राने परवानगी दिली. १६ जिल्हाधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. ईडीनंही रंजन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दाखल केली होती.