हत्येनंतर पत्नी व मुलीनं स्वत:ला कोंडून घेतलं; माजी पोलीस महासंचालक हत्या प्रकरणात…
कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश (६८) यांची बंगळुरूतील राहत्या घरी हत्या झाली. रविवारी संध्याकाळी त्यांच्या मुलाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी धारदार शस्त्र सापडले. हत्येच्या वेळी पत्नी व मुलगी घरात होत्या. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून संपत्तीच्या वादामुळे हत्या झाल्याचा संशय आहे. ओम प्रकाश २०१७ साली निवृत्त झाले होते.