इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांना हिंदी शीर्षके, केरळच्या शिक्षणमंत्र्याचा एनसीईआरटीवर संताप
देशात हिंदी भाषेवरून दक्षिणेकडील राज्यांचा केंद्र सरकारशी संघर्ष चालू आहे. एनसीईआरटीने नवीन इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांना रोमन लिपीत हिंदी नावं दिल्यामुळे केरळमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते, हा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा प्रकार आहे. केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या निर्णयाला विरोध केला आहे आणि इतर राज्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.