तुळशीचा अवमान केल्याप्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाईचे केरळ उच्च न्यायालयाचे आदेश!
केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात पोलिसांना आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अब्दुल हकीमने तुळशीच्या रोपाचा अवमान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे श्रीराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने श्रीराज यांना जामीन मंजूर केला आणि हकीमविरोधात कारवाईचे आदेश दिले. हकीम मानसिक रोगी असल्याचा दावा फेटाळून, न्यायालयाने त्याच्या व्यवसाय आणि वाहन परवान्याची चौकशी करण्याचे निर्देश दिले.