लैंगिक अत्याचार करणाऱ्या २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह
केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे, ज्यात एक अल्पवयीन आहे. दोन वर्षांच्या कालावधीत ६४ व्यक्तींनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. मुलीच्या समुपदेशनादरम्यान हे प्रकरण उघडकीस आले. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.