“संजय रॉय आधी रेड लाईट एरियात गेला आणि…”, कोलकाता प्रकरणातील आरोपीबाबत माहिती समोर
कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली, संजय रॉय गुन्हा करण्याआधी रेड लाइट एरियात गेला होता ही माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे देशभरात डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस चौकशीत संजयने डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे मान्य केले आहे.