ममता बॅनर्जींकडून आंदोलक डॉक्टरांच्या तीन प्रमुख मागण्या मान्य
कोलकाता येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार व हत्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमधील सरकारी डॉक्टरांनी काही मागण्या घेऊन संप चलू केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी डॉक्टरांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालक व आरोग्य सेवा संचालकांना हटवले असून, कोलकात्याचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनाही हटवण्याचे आश्वासन दिले आहे.