“४५ तासांचा उपवास, फक्त पाणी प्यायलो”; फ्रिडमन यांनी नेमकं काय सांगितलं?
अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंता आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन तासांची मुलाखत घेतली. मोदींनी बालपण, हिमालयातील अनुभव, संघाचे स्थान, पाकिस्तान-ट्रम्प संबंध यावर चर्चा केली. लेक्स फ्रिडमन यांनी या मुलाखतीसाठी दोन दिवस उपवास धरला होता. मोदींनी उपवासाच्या आध्यात्मिक आणि जीवनशैलीतील महत्त्वावर भाष्य केले. उपवासामुळे इंद्रिये तीक्ष्ण होतात आणि जीवनाला आकार मिळतो, असे मोदी म्हणाले.