लोकसभेत वक्फ विधेयकावरुन विरोधकांचा तुफान राडा, नेमकं काय घडलं?
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावरून लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला, ज्यामुळे कामकाज १५ मिनिटांसाठी आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. राज्यसभेतही अहवाल सादर होताच गोंधळ झाला. विरोधकांनी विधेयकात त्रुटी असल्याचा आरोप केला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आंदोलन केले. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना गोंधळ न घालण्याचे आवाहन केले.